बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:37 PM2019-08-02T12:37:45+5:302019-08-02T12:37:54+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे
बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, पीक कर्जाची अवश्यकता असलेल्या तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांपैकी प्रत्यक्षात २९ हजार ३८३ शेतकºयांन पीक कर्ज वाटप झाले असून त्याची टक्केवारी मात्र ही अवघी नऊ टक्के आहे.
मध्यंतरी बुलडाण्यात झालेल्या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने यंत्रणा सध्या व्यस्त आहे. त्यातच पीक कर्ज पूनर्गठणाची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्याचा अंतिम हवाल आला नसला तरी शेतकºयांच्या संमतीशिवाय पीक कर्जाचे पूर्नगठण बँकांना करता येत नाही. त्यामुळे तुर्तास तरी पूनर्गठणाचा हा आकडा ही १२०० शेतकºयांच्या पुढे गेला नसल्याची शक्यता आकडोरीवरून निर्माण होत आहेत. वास्तविक बुलडाणा जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २९ हजार ३८३ शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप झाले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत अनेक शेतकºयांनी वनटाईम सेटलमेंट न केल्यामुळे अनेक शेतकºयांना यंदा पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी दिसत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यंदा दोन लाख ६६ हजार ५२७ शेतकºयांना एक हजार २०४ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले असून त्यापैकी या बँकांनी २९ जुलै २०१९ पर्यंत १८ हजार १२ शेतकºयांना १३५ कोटी ३८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ही सात टक्के आहे दरम्यान व्यापारी बँकांनी दोन हजार ४९१ शेतकºयांना ४० कोटी २६ लाख ९२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांना प्रत्यक्षात २६ हजार ७६६ शेतकºयांना २४० कोटी ८९ लाख ४० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने तीन हजार ७३१ शेतकºयांना ३१ कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून त्यांना मिळालेल्या एकूण उदिष्टाच्या ते १२ टक्के वाटप झाले आहे. दुसरीकडे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पाच हजार १४९ शेतकºयांना २५ कोटी ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकेला नऊ हजार ४५० शेतकºयांना २८० कोटी ९९ लाख ८० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे.