भारत विद्यालयात विद्यार्थ्यांनापुस्तके वाटपास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:38 AM2021-08-28T04:38:51+5:302021-08-28T04:38:51+5:30
-- शेतपिकावर वन्य प्राण्यांचा हैदोस बुलडाणा : जिल्हाभर सध्या मूग,उडीद पीक तोडणीला आले आहे. अशातच मात्र, वन्य प्राणी त्या ...
--
शेतपिकावर वन्य प्राण्यांचा हैदोस
बुलडाणा : जिल्हाभर सध्या मूग,उडीद पीक तोडणीला आले आहे. अशातच मात्र, वन्य प्राणी त्या पिकावर ताव मारत असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वन्य प्राणी हिरावून घेत असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अवैध गुटखा विक्री वाढली
बुलडाणा : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र पान टपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे. तेव्हा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात गुटखा बंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विकल्या जाणारा गुटखा हा चढ्या भावाने विकल्या जात असून, अनेकजण यामधून मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावर पार्किंग
बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उद्भवण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.