शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:21+5:302021-02-05T08:37:21+5:30

यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता जिजाबाई भिकमसिंह राजपूत, चोरपांग्रा ता. लोणार येथील ...

Distribution of checks to the families of martyred soldiers | शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

Next

यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता जिजाबाई भिकमसिंह राजपूत, चोरपांग्रा ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना राठोड व वीरमाता सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रति कुटुंबीय ४० लक्ष रुपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना ४५ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनिषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपिता भगवंतराव भाकरे यांना ४० लक्ष रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत खामगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी कोळी यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार, महसूल सहायक किसन जाधव, संजय खुळे, राजेंद्र झाडगे, पो. कॉ. तारासिंग पवार, संतोष वनवे, दीपक वायाळ, रवींद्र गिते, संतोष काकड, होमगार्ड प्रविण साखरे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल खामगांव येथील श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमसी ज्ञानपीठची विद्यार्थिनी तनिष्का रितेश चौधरी हिचा गौरव करण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. मोहम्मद अस्लम व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणच्यावतीने सौर कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांना डिमांट नोट याप्रसंगी देण्यात आल्या.

Web Title: Distribution of checks to the families of martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.