जिल्ह्यात विविध ठिकाणी जंतनाशक गोळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:59+5:302021-03-07T04:31:59+5:30
या दिनाचे औचित्य साधून रायपूर येथील सरपंच सीमाताई सुनील देशमाने यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळा ...
या दिनाचे औचित्य साधून रायपूर येथील सरपंच सीमाताई सुनील देशमाने यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीसेविका, आशा वर्कर व मदतनीस यांच्या हस्ते घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त गावातील अंगणवाडीसेविका, आशा वर्कर व मदतनीस यांनी मुलांच्या घरोघरी जाऊन मुलांना जंताच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य कर्मचारी आर. जी. जाधव, आर. एस. जाधव, पी. एच. मेथे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉ.शिल्पा खराटे, डॉ.अमोल सदावर्ते, डॉ. वकार, डॉ. कल्याणी गायकवाड, डॉ. घोंगडे, आरोग्य कर्मचारी आर. एस. जाधव, जी. आर. चौथनकर, आय. जी. राठोड, मिलिंद जाधव, आर. जी. राठोड, पी. जे. रिंढे, पी. एच. मेथे, अर्चना गवई, अर्चना डोंगरे, सुनिता राजपूत, रुपाली भोसले आदींसह इतर उपस्थित हाेते.