दिव्या फाउंडेशनच्या माँ साहेब जिजाऊ पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:23+5:302021-03-10T04:34:23+5:30

बुलडाणा : दिव्या फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा ...

Distribution of Divya Foundation's Ma Saheb Jijau Awards | दिव्या फाउंडेशनच्या माँ साहेब जिजाऊ पुरस्कारांचे वितरण

दिव्या फाउंडेशनच्या माँ साहेब जिजाऊ पुरस्कारांचे वितरण

Next

बुलडाणा : दिव्या फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा गुणगौरव करून सन्मान केला जातो, आणि अशा महिलांना माँ साहेब जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत असताे. मात्र मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी कोरोनाचे संकट पुन्हा एकदा बळावले असल्याने यावर्षीचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला आहे. यावर्षीचा माँ साहेब जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार नंदिनी टारपे यांना प्रदान करण्यात आला आहे. नंदिनी टारपे ह्यांनी सामजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

बुलडाणा येथे २० स्थानिक महिला व पुरुषांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला व बाहेरील पुरस्कृत महिलांना ऑनलाईन पद्धतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षीचा माँ साहेब जिजाऊ पुरस्कार हा नंदिनी टारपे, बुलडाणा (सामाजिक, राजकीय क्षेत्र) रुबिना पठाण पत्रकार मुंबई, मेघा मोरे,कल्याण(सामाजिक कार्य) , आयुश्री संतोष सांगळे, प्रतिभा गुरव , सांगली(सामजिक क्षेत्रात), जयश्री चव्हाण राय , भुसावळ यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष सत्कार मूर्ती मध्ये प्रयागबाई कायस्थ यांचा विशेष सन्मान करण्यात आला

तर ऑनलाईन कार्यक्रमात ॲड. वर्षा पालकर ह्या अध्यक्षस्थानी होत्या तर गुंजन खडसे स्वागताध्यक्ष होत्या. पौर्णिमा सिंगरकर स्वागतोत्सुक , अलका निकाळजे, पोलीस इन्स्पेक्टर , स्मिता चेकेटकर उद्योजिका या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेते. आशिष खडसे, योगेश सिंगरकर, राजेंद्र टिकर, सुनील तिजरे, गजानन अवसारमोल, मोहम्मद इमरान, सोनू कायस्थ, रंजना कायस्थ ज्योती गवई, कोकिळा तोमर,अशोक काकडे, उपस्थित होते. संचालन संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले.

Web Title: Distribution of Divya Foundation's Ma Saheb Jijau Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.