३० लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:08+5:302021-07-27T04:36:08+5:30
गत काही वर्षांपासून विशेष कुटुंब कल्याण सहायता योजनेंतर्गत शासन दरबारी विधवा, परितक्त्या व निराधारांना शासनाकडून अनुदान दिले जाते. या ...
गत काही वर्षांपासून विशेष कुटुंब कल्याण सहायता योजनेंतर्गत शासन दरबारी विधवा, परितक्त्या व निराधारांना शासनाकडून अनुदान दिले जाते. या प्रकारची जवळपास बारा हजार प्रकरणे प्रलंबित होती. त्यापैकी आठ हजार प्रकरणांचा निपटारा जवळपास करण्यात आला आहे. इतरही प्रकरणे त्वरित निकाली काढल्या जातील. तालुक्यामध्ये ज्यांना आधार नाही, जवळपास त्या ४५ कुटुंबांनाही एक हजार रुपये महिना देण्यात येत आहेत. यामध्ये राहिलेल्या कुटुंबांनाही समाविष्ट करण्यात येईल, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन, याबाबतचे सर्व्हे करावे व सर्व कागदपत्रे शिवसेना कार्यालय मोताळा येथे जमा करावे आणि अशांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारच्या विमा योजनेंतर्गत बारा रुपयांचा विमा सर्वांनी काढावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व संबंधित लाभार्थी उपस्थित होते.