गरजूंना किराणा व धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:22+5:302021-05-05T04:56:22+5:30
डोणगाव व मेहकर शहरातील गोरगरीब कुटुंबांना धान्य आणि किराणा साहित्य वाटप करत समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला ...
डोणगाव व मेहकर शहरातील गोरगरीब कुटुंबांना धान्य आणि किराणा साहित्य वाटप करत समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे शैलेश सावजी यांचे कौतुक होत असून हाच आदर्श सर्वांनी घेऊन गोरगरीब नागरिकांना मदत करावी, असा संदेश या निमित्ताने दिल्या गेला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड, श्याम उमाळकर, एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष शैलेश खेडकर, प्रमोद जाधव, श्याम इंगळे, चरण आखाडे, सचिन साखळकर, विष्णू पळसकर, गणेश इंगळे, प्रभाकर इंगळे, संतोष जाधव, अजय मोरे यांनी मेहकर येथे कुंजविहार, जानेफळ रोड येथील कुटुंबाना डोणगाव येथील पातुरकर शाळे जवळील, विठ्ठल रुखमाई शाळेसमोरील व जवळा रस्त्यावर असणाऱ्या कुटुंबाना धान्य व किराणा साहित्य वाटप केले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये एकतर काम नाही व कुटुंबाचे पालन पोषण करावे कसे, असा प्रश्न या बाहेर गाव वरून आलेल्या कुटुंबासमोर उभा असताना शैलेश सावजी यांनी दिलेल्या मदतीने या कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळाले.