‘त्या’ साहित्याचे वाटप चिखली गोडाउनमधूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:00 AM2017-11-16T01:00:59+5:302017-11-16T01:06:13+5:30

चिखली : मोफत शिलाई मशीन आणि सायकल वाटपाच्या योजनेत चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लोकमतने उजेडात आणल्यानंतर जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी या साहित्य वाटपाबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

The distribution of the 'material' from Chikhali Godown | ‘त्या’ साहित्याचे वाटप चिखली गोडाउनमधूनच

‘त्या’ साहित्याचे वाटप चिखली गोडाउनमधूनच

Next
ठळक मुद्देजि.प.सभापती महालेंनी घेतली लोकमतच्या वृत्ताची दखल

प्रभाव लोकमतचा 
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन आणि गरीब घरातील विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल वाटपाच्या योजनेत चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लोकमतने उजेडात आणल्यानंतर या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी या साहित्याचे वाटप सिं.राजा, लोणार, मेहकर व दे.राजा येथील गोडाउन न देता चिखली येथूनच देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
यासंदर्भाने महाले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अनुदानावर देण्यात येणार्‍या शिलाई मशीन व सायकल यांचे वाटप तालुक्यातील गोडाउनमधूनच करण्यात येणार असून, त्याबाबतच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे म्हटले आहे. यासोबतच सदरचे साहित्य हे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारकिर्दीतील खरेदी केलेल्या गोडाउनमध्ये तसेच पडून होते, हे विशेष. त्यांना आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये या साहित्यासाठी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होऊ नये, याबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त केले आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी राबविणे आवश्यक असताना वर्षानुवष्रे चुकीच्या पायंड्यामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी व आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप देणारी असल्याची बाब गंभीर असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे; मात्र यापुढे जनतेला शासकीय योजनेचा लाभ देताना तो वस्तु स्वरूपात न देता थेट त्यांच्या खात्यात रक्कमच जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांनी घेतला असून, ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’मुळे खरेदी -विक्रीतील भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे सांगून यापुढे लाभार्थ्यांना कोणत्याही कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारण्याचे काम करावे लागणार नाही, याची ग्वाहीदेखील जि.प.सभापती महाले यांनी दिली आहे. 

Web Title: The distribution of the 'material' from Chikhali Godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.