कामगारांना साहित्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:02+5:302021-02-15T04:31:02+5:30
बुलडाणा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्याचे वितरण केले जाते. शिवसंग्राम संघटनेच्या पुढाकाराने ...
बुलडाणा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्याचे वितरण केले जाते. शिवसंग्राम संघटनेच्या पुढाकाराने या साहित्याचे कामगारांना वितरण करण्यात आले आहे.
विद्यार्थिनी उपस्थिती भत्त्यापासून वंचित
धामणगाव बढे : प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरण कल्याण धोरणानुसार शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढावी यासाठी आदिवासी मुलींसह मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थिनी उपस्थिती भत्त्यापासून वंचित आहेत.
मुलींना स्वतंत्र अभ्यासिकेचा लाभ
सिंदखेडराजा: तालुक्यातील आडगाव राजा येथे मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेचा मुलींना सध्या चांगला लाभ होत आहे. परीक्षा जवळ आल्याने मुलींसाठी ही अभ्यासिका फायद्याची ठरत आहे.
रब्बी पिकांना संजिवनी
हिवरा आश्रम: पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याचे सिंचन क्षेत्र ६८२ हेक्टर आहे. तर शाखा कालव्याचे सिंचन क्षेत्र ३ हजार ८९३ इतके आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, मका व ज्वारी पिकांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती पेनटाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता चौगुले यांनी दिली.