आता शहरी भागाच्या शाळेतील तांदूळ वितरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:20 PM2020-04-18T14:20:31+5:302020-04-18T14:20:40+5:30
लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे सावध पवित्रा घेत तांदूळ वितरणाचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामीण भागापाठोपाठ आता शहरी भागातील शाळांमधील शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांमध्ये वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मात्र लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे सावध पवित्रा घेत तांदूळ वितरणाचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या निर्णयानंतर शहरी भागातील शाळेतील तांदूळ वितरणाचा तीढा सुटेल.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहू नये, यासाठी ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्याना वितरण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबाजवणी करण्यात आली. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच शाळांमधील शिल्लक असलेला तांदूळ, डाळी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे. आता ग्रामीण भागाप्रमाणेच राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थी किंवा पालकांना वितरित करण्याचे निर्देश १५ एप्रिल रोजी शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भात सर्व शिक्षणाधिकाºयांना शिक्षण विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक व योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिल्लक तांदळाचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरण करावयाचे आहे. परंतू जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढच आहे. या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षणाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपाबाबतचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात येणार असून त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार तांदूळ वितरणाचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून आलेल्या आहेत. परंतू कोरोनाच्या पृष्टभूमीवर जिल्ह्याची परिस्थिती पाहता, तांदूळ वितरणाबाबत जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील त्यानुसार अंमलबजावणी होईल.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.