‘एक घर एक झाड’ संकल्पनेतून तीन हजार झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:15 PM2017-09-08T20:15:14+5:302017-09-08T20:16:22+5:30
दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दरवर्षी बिकट होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष निलेश नाहटा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दरवर्षी बिकट होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष निलेश नाहटा यांनी केले.
जानेफळ येथे झालेल्या बुधवारी एका कार्यक्रमात नाहटा बोलत होते. गणेश विसर्जन दरम्यान लोकमान्य टिळक गणेश मंडळ व वनविभाग यांच्या संकल्पनेतून ३ हजार झाडाचे प्रत्येक कुटूंबाला वितरण करण्यात आले. यावेळी झाडे वाटप करतांना गावातील महिला-पुरुष यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वनविभाग घाटबोरी क्षेत्राचे वनअधिकारी पाटील, सुभाष नागरे, निलेश नाहटा व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी घरोघरी जावून झाडांचे वाटप केले. तर झाड लावून त्याचे काळजीने संगोपन करा, असे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक गणेश मंडळाच्यावतीने सतत दहा दिवस भक्तीमय व धार्मिक कार्यक्रम घेऊन अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश सदावर्ते, उपाध्यक्ष मंटू राजुरकर, डॉ.श्रीकृष्ण काकडे, डॉ.सुभाष गट्टाणी, भिमराव उंबरकर, गणेश अक्कर, रतनलाल मंगी, सुभाष अक्कर, प्रकाश जोशी, निलेश मुळे, मोतीराम चांगाडे, राजु पाखरे, संतोष सुरडकर, निलेश महाजन, सागर मोरे, संदीप मुरडकर, साधना पाखरे, संगिता इंगळे, नंदाबाई चांगाडे, गोपाल गट्टाणी, वनपाल सुभाष नागरे, अॅड.काळे, गजानन दुतोंडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.