जिल्ह्यात १२ जण पॉझिटिव्ह, दहा जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:03+5:302021-09-10T04:42:03+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा दोन, देऊळगावराजा दोन, मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील एक, मेहकर एक, खंडाळा एक, चिखली दोन, लोणार एक, ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा दोन, देऊळगावराजा दोन, मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील एक, मेहकर एक, खंडाळा एक, चिखली दोन, लोणार एक, वडोदा एक, खामगावमधील एकाचा समावेश आहे. दरम्यान, दहा जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ७ लाख १ हजार ४२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणाऱ्या ८६ हजार ७७४ जणांना आजपर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. अद्यापही १ हजार २६५ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ५११ झाली आहे. त्यापैकी ६४ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत ६७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.