जिल्ह्यात १८ जण पॉझिटिव्ह, १४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:12+5:302021-07-17T04:27:12+5:30

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १ हजार ९४२ अहवालांपैकी १ हजार ९२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा ...

In the district, 18 people tested positive and 14 people beat Corona | जिल्ह्यात १८ जण पॉझिटिव्ह, १४ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात १८ जण पॉझिटिव्ह, १४ जणांची कोरोनावर मात

Next

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १ हजार ९४२ अहवालांपैकी १ हजार ९२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील एक, शेगाव एक, देऊळगाव राजा चार, चिखली सात, मेहकर एक आणि जळगाव जामोद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान खामगाव, मलकापूर, नांदुरा, लोणार, मोताळा, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे १४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ११ हजार ९०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच एकूण कोरोना बाधितांपैकी ८६ हजार ४८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

--१८३० अहवालांची प्रतीक्षा--

तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १ हजार ८३० अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८७ हजार १९० झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ४० सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: In the district, 18 people tested positive and 14 people beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.