जिल्ह्यात २0९९ शेततळी झाली पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:36 AM2017-09-04T00:36:13+5:302017-09-04T00:36:28+5:30
बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क

शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकर्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे शेततळे ३0 बाय ३0 बाय ३ मीटर तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर असे आकारमान निश्चित करण्यात आले आहे. सर्वात मोठय़ा शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ५0 हजार रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे, तर इतर शेततळ्यांसाठी त्यांच्या आकारमानानुसार अनुदान प्राप्त होणार आहे.
अनुदानाशिवाय जास्तीचा खर्च शेतकर्याला करावा लागणार असून, शेतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण पाच हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जांतून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकर्यांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकर्यांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली; मात्र त्यापैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
१ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान अदा
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्ह्यात यावर्षी २ हजार ९९ शेततळे पूर्ण झाले असून, या शेततळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे, तर पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी १ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान एकूण ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये संबंधित शेततळे घेतलेल्या शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
-