जिल्ह्यात ४१६ पॉझिटिव्ह, १३६ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:53+5:302021-02-24T04:35:53+5:30

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी २,०४९ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ४१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

In the district, 416 positive, 136 people defeated Corona | जिल्ह्यात ४१६ पॉझिटिव्ह, १३६ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ४१६ पॉझिटिव्ह, १३६ जणांची कोरोनावर मात

Next

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी २,०४९ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ४१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १,६३३ अहवाल निगेटिव्ह आले.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये झाडेगाव १४१, आसलगाव ६, मोताळा ३, मूर्ती ४, थड २, सिंदखेड २, बुलडाणा ६२, येळगाव १, केसापूर १, पाडळी १, सुंदरखेड १, देऊळघाट २, पिंपळगाव सराई १, सागवन ४, जानेफळ १, जानोरी ७, चिंचोली १, तळेगाव १, शेगाव ३१, खामगाव ७, तांबुळवाडी १, सावरगाव डुकरे १, अमडापूर १, मेरा खु. १, भालगाव १, शेलूद १,, खैरव १, जांभोरा २, पळसखेड दौलत ५, पेनसावंगी १, कव्हाळा ३, तेल्हारा १, शेलूद १, दहीगाव १, मंगरूळ नवघरे १, सोमठाणा १, आमखेड १, सवणा १, चिखली २३, दे. राजा २२, सिनगाव जहाँगीर ५, डोढ्रा २, गारगुंडी १, किन्ही १, दे. मही ५, येवती ६, हिरडव १, भानापूर १, नायगाव १, पिंपळनेर १, नांद्रा ३, तांबोळा १, सुलतानपूर ३, वेणी १, लोणार १७, नांदुरा १, मलकापूर १, सिं. राजा ४, किनगाव राजा १, सोनाळा १, बावनबीर १, वरवट बकाल १, बीड जिल्ह्यातील २, अैारंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील १, जालना जिल्ह्यातील संजोळ येथील १, अमरावती येथील सौरभ कॉलनीमधील १ याप्रमाणे ४१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, १३६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत कोरोना चाचणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख २३ हजार ४६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १४ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

५,०३० अहवालांची प्रतीक्षा

अद्यापही ५,०३० संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १६ हजार ९१२ जण कोरोनाबाधित असून त्यापैकी १,९०३ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: In the district, 416 positive, 136 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.