जिल्ह्यात ८९ पॉझिटिव्ह, ३२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:35+5:302021-07-03T04:22:35+5:30
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१ व रॅपिड टेस्टमधील १८ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९, खामगाव तालुक्यात ...

जिल्ह्यात ८९ पॉझिटिव्ह, ३२ जणांची कोरोनावर मात
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१ व रॅपिड टेस्टमधील १८ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९, खामगाव तालुक्यात सात, शेगाव चार, देऊळगावराजा एक, चिखली नऊ, मेहकर एक, मलकापूर तीन, नांदुरा एक, जळगाव जामोद १३, सिंदखेड राजा तालुक्यातील ४१ जणांचा समावेश आहे. दरम्यान लोणार, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही.
दरम्यान, ३२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालापैकी ५ लाख ७८ हजार ५२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोबतच कोरोनाबाधितांपैकी ८६ हजार १० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१,७१३ अहवालांची प्रतीक्षा--
संदिग्ध रुग्णांपैकी अद्यापही १ हजार ७१३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८६ हजार ८२६ झाली आहे. त्यापैकी १५३ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.