समृद्ध गाव स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:20+5:302021-07-12T04:22:20+5:30

या बैठकीमध्ये समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या मोताळा तालुक्यातील सर्व गावांच्या पुढील काळातील कामांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ ...

District Collector reviews prosperous village competition | समृद्ध गाव स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

समृद्ध गाव स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next

या बैठकीमध्ये समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या मोताळा तालुक्यातील सर्व गावांच्या पुढील काळातील कामांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीद्वारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पर्जन्यमापक उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन झालेले असून, लवकरच गावांना पर्जन्यमापक उपलब्ध होतील असे जाहीर केले. या बैठकीमध्ये डॉ़ अविनाश पोळ यांनी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेची रूपरेषा, पुढील वाटचाल याबाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी माचेवाड उपजिल्हाधिकारी रोहयो उपस्थित होते. रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामाबाबत प्रशासनाकडून गावाला १०० टक्के सहकार्य राहील, असे आश्वस्त केले.

‘राेहयाे’तून विविध कामे करण्याची सूचना

समृद्ध गाव स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातून एकमेव मोताळा तालुक्याची निवड होणे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे़ वॉटर कप स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेमध्ये जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने गावे करीत असलेल्या कामांकरिता पूर्ण क्षमतेने पाठबळ देण्यात येईल़ तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावामध्ये जल व मृदा संधारण, वृक्षरोपण, गवत संगोपन, शोषखड्डे निर्मिती, इत्यादी कामे प्राधान्याने करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

Web Title: District Collector reviews prosperous village competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.