बुलडाण्यात रंगल्या जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:30 PM2018-08-19T12:30:27+5:302018-08-19T12:31:41+5:30
बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खेळाडुंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा चांगल्याच रंगल्याचे पाहावयास मिळाले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा च्यावतीने आयोजित जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे बुलडाणा येथे रविवारला पार पडले. जिल्हा क्रीडा संकुल येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी तथा सचिव जिल्हा तलवारबाजी असोसिएशन शेषनारायण लोढे यांचे हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. तर तालुका क्रीडा अधिकारी घ.ल.राठी, क्रीडा भारती जिल्हा सचिव राजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम प्रमुख अतिथींचे मोमेन्टो देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेषनारायण लोढे यांनी खेळाडूंनी या खेळात सातत्याने सराव केल्यास, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तरापर्यंत नक्कीच पोहचाल असे सांगीतले. तर शेखर पाटील यांनी, खेळाडूंनी खेळत असताना खेळ भावना जोपासुन, उत्कृष्ठ खेळ करावा, असे आवाहन केले. संचलन व आभार प्रदर्शन नितीन जेऊघाले यांनी केले. स्पर्धेला पंच म्हणून अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर, विजय पळसकर, भगवान अरसुडे यांनी काम पाहिले.