जि. प. अध्यक्षांनी वाचविले वृद्धाचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:36 AM2017-09-13T00:36:15+5:302017-09-13T00:36:15+5:30

पोटाच्या दुखण्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रय त्न करीत असलेल्या एका ७0 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्‍याचे  प्राण केवळ जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांच्या सजगतेमुळे  वाचल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास  निंबारी फाट्यानजीकच्या शेतशिवारात घडली.

District Par. Presidents save lives of old man! | जि. प. अध्यक्षांनी वाचविले वृद्धाचे प्राण!

जि. प. अध्यक्षांनी वाचविले वृद्धाचे प्राण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: पोटाच्या दुखण्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रय त्न करीत असलेल्या एका ७0 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्‍याचे  प्राण केवळ जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांच्या सजगतेमुळे  वाचल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास  निंबारी फाट्यानजीकच्या शेतशिवारात घडली.
शेतकर्‍याकरिता उमा तायडे जणू देवदूत बनून आल्याचाच  प्रत्यंतर या घटनेतून समोर आला आहे.   जिल्हा परिषद  अध्यक्ष उमा तायडे  नेहमीप्रमाणे बुलडाण्याला जात होत्या.  दरम्यान, निंबारी फाट्यानजीक असलेल्या शेतशिवारात एक  ७0 वर्षीय शेतकरी आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब  निदर्शनास पडली असता त्यांनी तत्काळ चालकास गाडी  थांबवायला लावून त्या झाडाकडे धाव घेतली. विनोद  क्षीरसागर, संदीप सोनवणे यांनी त्या वृद्ध इसमास पकडून  बाजूला केले. 
यावेळी उमा तायडे यांनी चौकशी केली असता तो इसम  बोराखेडी येथील रहिवासी असून, त्याचे नाव नवृत्ती नेमाडे  आहे. 
पोटाच्या विकाराने त्रस्त होऊन आपली जीवनयात्रा संपवित  असल्याची व्यथा त्याने कथन केली. यावेळी तायडे यांनी  समजूत काढून त्यास दौरा रद्द करीत उपजिल्हा रुग्णालयात उ पचारार्थ भरती केले. तसेच त्यांच्या नातेवाइकांना सदर बाब  कळविली.
 ही बाब कळताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव  घेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: District Par. Presidents save lives of old man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.