जिल्ह्याची पावले अनलॉकच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:58+5:302021-06-06T04:25:58+5:30
राज्य शासनाने ३ जूनला प्राप्त माहितीच्या आधारावर हा पाचस्तरीय अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात सोमवारपासून ...
राज्य शासनाने ३ जूनला प्राप्त माहितीच्या आधारावर हा पाचस्तरीय अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात सोमवारपासून होणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या सद्या ८५ हजार ४८८ झाली असून, यापैकी १ हजार १३६ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्याचा शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट अवघा १.७९ टक्के आला आहे. दुसरीकडे ५ जूनला सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी यांची अनुषंगिक विषयान्वये एक व्हीसी झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्हा हा चौथ्या नव्हे, तर तिसऱ्या स्तरात असल्याचे स्पष्ट झाले.
--कोरोना स्थिती--
- कोरोनाचे एकूण रुग्ण:- ८५,४८८
- बरे झालेले रुग्ण:- ८३,७२३
- एकूण मृत्यू:- ६२९
- सध्या उपचार घेत असलेले रुग्ण:-११३६
- सध्या ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण:- २३४
-----
१) पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या टप्प्यात येईल.
२) पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.
३) पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.
४) पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर असा भाग चौथ्या स्तरात येईल.
५) पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.
--काय सुरू राहील?--
- सर्व अत्यावश्यक व अन्य सेवा दुपारी चारपर्यंत सुरू राहतील.
- रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील.
- मॉर्निंग वॉकला परवानगी. मैदानांवर सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ दरम्यान खुली.
- खासगी आस्थापनाही ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी आस्थापनाही दुपारी चारपर्यंत सुरू राहतील.
- शाकीय व खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील.
- सार्वजनिक कार्यक्रमांना ५० टक्केच उपस्थिती
- लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच मुभा, अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी
- सार्वजनिक वाहतूक सुरू, पण उभ्याने प्रवासास बंदी
- उद्योग व्यवसाय ५० टक्के उपस्थितीत नियमितपणे सुरू राहतील.
--काय बंद राहील?--
- मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहतील.
- इंडोअरमधील क्रीडा मैदाने बंद राहतील.
- सायंकाळी पाचपर्यंत जमावबंदी राहील. त्यानंतर संचारबंदी.
---
बुलडाणा जिल्हा हा तिसऱ्या स्तरामध्ये आहे. जिल्ह्यातील मर्यादित अनलॉक बाबतचा आदेश ६ जूनला काढण्यात येईल. मात्र, नागरिकांनी अद्यापही कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन अधिक गांभीर्यपूर्वक करण्यात यावे. त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
(एस. रामामूर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा)