जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार -शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:01+5:302021-07-29T04:34:01+5:30
यासंदर्भात स्थानिक विश्रामगृहावर बुधवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये तोंडाचा कॅन्सर, ...
यासंदर्भात स्थानिक विश्रामगृहावर बुधवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे व त्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती केल्यास व याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो, असा विश्वास कॅन्सर प्रकल्पाचे सल्लागार डॉ. नंदकुमार पानसे यांनी यावेळी व्यक्त केला.
कॅन्सरवरील उपचारास मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हा उपचार खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असून, जिल्ह्यात कॅन्सरबाबत जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास जिल्ह्यातील लाखो सामान्य लोकांना याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे अभियान जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस कॅन्सर प्रकल्पाचे सल्लागार डॉ. नंदकुमार पानसे, विजया दुलंगे, प्रदीप सोळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी लाड, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ प्रामुख्याने उपस्थित होते.