काेराेनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:50+5:302021-06-16T04:45:50+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़ रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट एक ...

District's move towards Kareena Mukti | काेराेनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल

काेराेनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़ रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षाही कमी हाेता़ साेमवारी केवळ ५५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला़ दरम्यान, साेमवारपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बाजारात चैतन्य आले हाेते़

मार्च महिन्यात जिल्ह्यात काेराना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला हाेता़ त्यामुळे, एप्रिलपासून जिल्ह्यात विविध निर्बंध लावण्यात आले हाेते़ गत वर्षीपासून निर्बंधामुळे व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत़ बुलडाणा शहरामध्ये अनेक व्यावसायिक आठवडी बाजारात दुकाने लावतात़ काेराेना संसर्ग वाढल्याने आठवडी बाजारांवर बंदी आहे़ गत दाेन ते अडीच महिने आठवडी बाजारासह इतर दुकाने बंद असल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत़ गत काही दिवसांपासून जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट कमी हाेत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे़ १४ जूनपासून बुलडाणा जिल्ह्या लेव्हल एकमध्ये आल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे़ त्यामुळे साेमवारी बाजारात चैतन्य आले हाेते़

दाेन तालुक्यांत एकही पाॅझिटिव्ह नाही

साेमवारी जिल्ह्यातील नांदुरा आणि माेताळा तालुक्यात एकही पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ तसेच संग्रामपूर, मलकापूर तालुक्यांत एक, तर जळगाव जामाेद मेहकर तालुक्यात केवळ दाेन रुग्ण आढळले़ बुलडाणा आणि लाेणार तालुक्यातील तिघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ रविवारी चार तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता़ तसेच जळगाव संग्रामपूरमध्ये केवळ एक रुग्ण आढळला हाेता़

बाजारात गर्दी वाढली

सर्वच दुकानांना परवानगी देण्यात आल्याने साेमवारी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली हाेती़ काेराेनाची ओसरत असलेली लाट प्रशासनासाठी दिलासादायक ठरत आहे़ मात्र, अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्यताही आहे़ त्यामुळे, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे़

Web Title: District's move towards Kareena Mukti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.