कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी घटस्फोट रोखणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:10 AM2017-09-13T00:10:59+5:302017-09-13T00:10:59+5:30
खामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे.
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे.
जुन्या काळातील पारंपरिक चालीरीती व संस्कार लोप पावत चालल्याने याचे परिणाम समाजजीवनावर होऊ लागले आहे त. समाजापेक्षा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार बळावल्याने व त्याग आणि सहनशीलतेपेक्षा भौतिक सुखाला महत्त्व प्राप्त झाल्याने कुटुंबव्यवस्थेला तडा जात आहे. कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण जसे वाढले तसेच घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कोलमडून तर पडणार नाही ना, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. याचा विपरीत परिणाम भावी पिढीवर होऊ शकतो. याकरिता क्षत्रिय राजपूत सेवा मंडळाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढते घटस्फोट हे समाजजीवनाच्या दृष्टीने चिंताजनक असून, याकरिता बदल ती जीवनशैली, व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या चुकीच्या संकल्पना, व्यसने, पाश्चात्य संस्कृतीचा युवा मनावरील पगडा, अशी वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही स्त्री व पुरुषाचा विवाह हा फक्त दोन मनांना जोडणारा नसतो. घटस्फोट रोखले जाणे काळाची गरज बनली असून, यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय राजपूत सेवा मंडळाने घेतला आहे.
विवाहप्रसंगी देणार घटस्फोट न घेण्याची शपथ
सदर उपक्रमांतर्गत क्षत्रिय राजपूत सेवा मंडळाकडून समाजा तील जोडप्यांना विवाहप्रसंगीच प्रापंचिक जीवनात एकमेकांशी जुळवून घेण्याचे वचन घेऊन घटस्फोट न घेण्याची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे विवाहबंधन हे आयुष्यभरासाठी असल्याचे नवविवाहित जोडप्याच्या मनावर बिंबवले जाईल. यातून घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न मंडळ करणार आहे.
व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न
व्यसनाधीनतेमुळे संसार मोडण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण दारू व इतर व्यसनांमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष कर तात. त्यामुळे त्यांचे घटस्फोट होतात. यास्तव तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे. केंद्रांची मदत घेऊन व्यसने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.