दिव्यांग युवकाने गणपती उत्सवात साकारला शासनाच्या योजनांचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 07:33 PM2017-09-04T19:33:36+5:302017-09-04T19:36:35+5:30

धाड (बुलडाणा) : पायाने दिव्यांग असलेल्या एका सुशिक्षीत बेरोजगार युवकाने, हालाखीच्या परिस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील विविध सामाजिक योजनांचा देखावा गणपती उत्सवादरम्यान साकारला आहे.

Divya Yuva started the Ganapati festival with the look of government schemes | दिव्यांग युवकाने गणपती उत्सवात साकारला शासनाच्या योजनांचा देखावा

दिव्यांग युवकाने गणपती उत्सवात साकारला शासनाच्या योजनांचा देखावा

Next
ठळक मुद्देचांडोळ येथील सुनिल नामदेव चव्हाण दिव्यांग युवकाने साकारला देखावादेखावा पाहण्यासाठी गर्दी 

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड (बुलडाणा) : पायाने दिव्यांग असलेल्या एका सुशिक्षीत बेरोजगार युवकाने, हालाखीच्या परिस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील विविध सामाजिक योजनांचा देखावा गणपती उत्सवादरम्यान साकारला आहे.
चांडोळ येथील सुनिल नामदेव चव्हाण दिव्यांग युवकाने घरामध्ये गणपतीची स्थापना केली. त्याने घरामध्ये सरकारच्या विविध योजनांची माहिती व निर्णयांची माहिती देखाव्याच्या माध्यमातून सादर केली. त्यांच्या या उपक्रमाची दखल गावकºयांनी घेतली आहे. दररोज अनेकांची गर्दी हा देखावा पाहण्यासाठी होत आहे. सन २०१३ दरम्यान सांध्याचा क्षयरोगाने ग्रस्त झाल्याने सुनील यांना अपंगत्व आले. त्यानंतर त्यांनी गरिबीच्या स्थितीत १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. आजारपणात शिक्षण सुटले. घरची गरिबी, आई-वडिल यांची मजुरी हेच उत्पन्नाचे मूळ साधन आहे. त्यातही सुनिल चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन सरकारच्या तीन वर्षाच्या योजना व निर्णय यांची जनजागृती सर्व स्तरात व्हावी म्हणून गणेश उत्सवाच्या निमित्ताने एक जिवंत देखावा निर्माण केला. त्याकरीता सर्व देखावा स्वत: तयार केला. यामध्ये अवयवदान, नोटबंदी, शौचालय बांधकाम, उघड्यावर शौच, बेटी बचाओ, स्वच्छ भारत अभियान, उज्वला योजना, क्षयरोग शोध मोहीम, प्रधानमंत्री आवास, शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रुण हत्या, अशा योजनांची प्रतिकृती निर्माण केली.

Web Title: Divya Yuva started the Ganapati festival with the look of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.