दिव्यांग विद्यार्थिनींना मिळणार विद्यावेतन
By admin | Published: September 6, 2016 02:09 AM2016-09-06T02:09:33+5:302016-09-06T02:09:33+5:30
दिव्यांग विद्यार्थिनींचे दरमहा २00 रुपये ऑनलाइन जमा होणार!
खामगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांंना टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंंतच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष २0१६-१७ पासून विद्यावेतन मिळणार आहे. दरमहा २00 रुपये प्रमाणे वार्षिक दोन हजार रुपये रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात ऑनलाइन जमा होणार आहे.
शिक्षणाचा बालहक्क कायदा २00९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांंना शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांंचा शाळेकडे ओढा कायम राहण्यासाठी शासनाच्यावतीने मोफत पाठय़पुस्तके, मोफत गणवेश, विविध शिष्यवृत्या देण्यात येत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांंप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सर्व शिक्षा अभियानच्यावतीने या विद्यार्थ्यांंची विशेष काळजी घेतल्या जात आहे. वर्ग १ ते ८ पर्यंंतच्या सर्व प्रवर्गाच्या ४0 टक्के दिव्यांगांचे प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांंना मदतनीस व प्रवास भत्ता म्हणून दरमहा २५0 रुपये प्रमाणे २५00 रुपये वार्षिक दिले जातात. यासोबत दिव्यांग विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी होऊन गरजवंतांना श्रवणयंत्र, कॅलीपर, व्हीलचेअर, ब्रेल किट, तीन चाकी सायकल, अंधकाठी असे साहित्य देण्यात येत आहे.
वर्ग १ ते ८ पर्यंंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांंंना लाभ दिल्या जात असताना इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांंनाही हा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने शैक्षणिक वर्ष २0१६-१७ पासून केवळ दिव्यांग विद्यार्थिनींना दरमहा २00 रुपये विद्यावेतन देण्याचे धोरण ठरविले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या दिव्यांग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत सन २0१५-१६ च्या यू डायस आधारभूत माहितीच्या अनुषंगाने शाळा दाखल असलेल्या सर्व दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांग विद्याथ्यार्ंची शाळेतील उपस्थिती टिकवणे त्यांना शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सहाय्यभुत व्हावे, याकरिता प्रोत्साहनपर भत्ता म्हणून विद्यावेतन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ३१९ विद्यार्थिनींना मिळणार लाभ
दिव्यांग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत माध्यमिक इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंंंतच्या दिव्यांग विद्या िर्थनींना प्रतिवर्षी दोन हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३१९ विद्यार्थिनींचा समावेश असून, खामगाव तालुक्यातील ८८ लाभार्थींंं आहेत. विद्यावेतनाचा लाभ लाभार्थ्यांंंच्या बँक खात्यात जमा होत असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांंंचे खाते क्रमांक संबंधित तालुक्याच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयात जमा करावयाचे आहेत.