बुलडाणा जिल्ह्यातील  दिवाळी जादा बसेस पूर्व विदर्भात धावेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:31 PM2018-11-10T17:31:51+5:302018-11-10T17:32:08+5:30

बुलडाणा: दीपावली सणानिमित्त व सलग सार्वजनीक सुट्यांमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ह्यदिवाळी जादाह्ण बसेस सोडण्यात आल्या आहेत.

Diwali extra buses in Buldhana district not run in eastern Vidarbha region | बुलडाणा जिल्ह्यातील  दिवाळी जादा बसेस पूर्व विदर्भात धावेनात

बुलडाणा जिल्ह्यातील  दिवाळी जादा बसेस पूर्व विदर्भात धावेनात

Next

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दीपावली सणानिमित्त व सलग सार्वजनीक सुट्यांमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ह्यदिवाळी जादाह्ण बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातून १९ शेड्युल नव्याने सोडण्यात आल्या असून, ह्या सर्व फेºया मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातच जात आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्वच बसस्थानके प्रवाशांनी ह्यहाऊसफुल्लह्ण झाली आहेत. परंतू गर्दीच्या या हंगामात जिल्ह्यातून ह्यदिवाळी जादाह्ण नावाची एकही बसफेरी पूर्व विदर्भात धावत नसल्याचे दिसून येते.
दीपावलीनिमित्त विद्यार्थी, महिला व नोकरदारांची होणारी गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. ५ ते ९ नोव्हेंबर हा दिवाळी सणाचा कालावधी असल्याने १ नोव्हेंबरपासूनच सर्वत्र जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. बुलडाणा विभाग नियंत्रकांकडून जिल्ह्यातील चार बसस्थानकावरून जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व ठिकाणावरून दिवाळी जादा बसफेºया सोडण्यात आल्या आहेत. बुलडाणा, चिखली, खामगाव व मलकापूर या बसस्थानकांवरून दिवसाला १९ नियते सोडण्यात येत आहेत. त्यामध्ये ३७३३.६ कि़मी. अंतर दिवसाला पार करण्यात येत आहे. परंतू दिवाळी जादा नावाने सोडण्यात येत असलेल्या सर्व बसेस ह्या मराठवाडा व पश्चिम विदर्भाकरीताच जात आहेत. यामध्ये पूर्व विदर्भ भागात म्हणजे नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदीया या भागासाठी जिल्ह्यातून एकाही जादा बसचे नियोजन करण्यात आले नाही. सध्या बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना सुविधांचा अभाव जाणवत आहे.
बॉक्स.......
जिल्ह्याचा ओढा औरंगाबाद, पुण्याकडे
बुलडाणा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता जळगाव खांदेश, अकोला, मराठवाड्याशी सिमा लागलेल्या आहेत. त्यामुळे मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद या तालुक्यांचे बहुतांश आर्थिक व्यवहार तथा सामाजिक संबंध हे जळगाव खांदेशशी; तर शेगाव, खामगाव, संग्रामपूर तालुक्यांची कनेक्टीव्हीटी ही पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याशी जुळलेली आहे. घाटावरील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्याचे बहुतांश आर्थिक तथा सामाजिक संबंध हे मराठवाड्यातील औरंगाबाद जालना, परभणी, जिंतूर या जिल्ह्यांशी जुळलेले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील तथा पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याकडे प्रवाशांचा ओघ सातत्यपूर्ण आहे. दीपोत्सवातील बसगाड्यांचे नियोजनही हा संदर्भ ठेवून करण्यात आल्याने पूर्व विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची स्थिती आहे.


जिल्ह्यातील तीन आगार दुर्लक्षीत
जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद ह्या सात ठिकाणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार आहे. या सात आगारांपैकी केवळ बुलडाणा, चिखली, खामगाव व मलकापूर या चार आगारातून दिवाळी जादा बसेस सुरू आहेत. मेहकर, शेगाव, जळगाव जामोद या ठिकाणावरून प्रवाशांची संख्या जास्त असतानाही जादा बसेस सोडण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते.

Web Title: Diwali extra buses in Buldhana district not run in eastern Vidarbha region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.