दिवाळीत बसणार भाडेवाढीचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:09 AM2017-10-04T01:09:37+5:302017-10-04T01:10:40+5:30
खामगाव : सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, आता प्रवासासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. एसटी महामंडळाने दी पावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर १0 ते २0 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त भार पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, आता प्रवासासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. एसटी महामंडळाने दी पावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर १0 ते २0 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त भार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक तूट भरून काढण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवास भाड्यात अ ितरिक्त वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे पत्रकदेखील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना पाठविण्यात आले. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच साध्या आणि निमआराम बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरि क्त बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त बाहेरगावहून येणार्या नोकरदार वर्गासोबतच भाऊबीजेसाठी माहेरी जाणार्या आणि माहेरहून सासरी परतणार्या बहिणींना सुविधा व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने यावर्षीदेखील अतिरि क्त गाड्यांचे नियोजन केले आहे.
या कालावधीत होणार भाडेवाढ !
प्रवाशांना दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांमध्ये अतिरिक्त भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. ही भाडेवाढ १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर ३१ ऑक्टोबरपर्यं त ही भाडेवाढ संपुष्टात येणार आहे. यामध्ये साध्या बसच्या प्रवास भाड्यात १0 टक्के, निमआराम बसच्या प्रवास भाड्यात १५ टक्के तर वातानुकूलित बसच्या प्रवास भाड्यात २0 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.
दिवाळीत हंगामी भाडेवाढीचे संकेत आहेत. यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणतेही पत्र प्राप्त झाले नसले तरी, नियोजनानुसार भाडेवाढ केली जाईल. दिवाळीचा कालावधी संपुष्टात येताच, हंगामी भाडेवाढही संपुष्टात येईल.
- आर.आर.फुलपगारे
आगार व्यवस्थापक, खामगाव.