शाळांना दिवाळीची २० नोव्हेंबरपर्यंत सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:22 PM2020-11-09T16:22:36+5:302020-11-09T16:22:44+5:30

७ ते २०  नोव्हेंबर दरम्यानच्या काळात दिवाळी सुटी देण्यात आली आहे.

Diwali holidays for schools till November 20 | शाळांना दिवाळीची २० नोव्हेंबरपर्यंत सुटी

शाळांना दिवाळीची २० नोव्हेंबरपर्यंत सुटी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : काेराेना काळात शाळा बंद असल्याने आँनलाइन वर्ग सुरू आहेत. त्या शाळांसोबतच इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यालयांना  ७ ते २०  नोव्हेंबर दरम्यानच्या काळात दिवाळी सुटी देण्यात आली आहे. या दरम्यान, विद्यार्थ्यांचे आँनलाइन वर्ग बंद ठेवले जाणार आहेत. 
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे चालू वर्षात राज्यात शाळा सुरू करता येणे शक्य झाले नाही. त्याबाबतचे अधिकार संबंधत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त, शिक्षण समित्यांना देण्यात आले. त्यानुसार जुलै २०२० पासून पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या वर्गासाठी आँनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने आधी १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान या कालावधीत सुटी घोषित केली. 
त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला. त्याबाबतचा ५ नोव्हेंबर रोजीचा शासन आदेश ७ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आला. नव्या आदेशानुसार शाळांना ७  ते २० नाेव्हेंबर दरम्यान सुटी देण्यात आली आहे. या काळात
आँनलाइन वर्ग बंद राहणार आहेत. तर  ज्या शिक्षकांना इयत्ता १० वी, १२  वीच्या पूरवणी परिक्षेची जबाबदारी आहे, त्यांना १९ नोव्हेंबर रोजीच उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: Diwali holidays for schools till November 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.