प्रवाशांच्या दिमतीला ‘दिवाळी जादा’ नावाची लालपरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 06:13 PM2018-10-16T18:13:41+5:302018-10-16T18:14:45+5:30
बुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसेसवर ‘दिवाळी जादा’ असा उल्लेख राहणार आहे. दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी व एसटी महामंडळाला मिळणारे उत्पन्न पाहता यावर्षी १ ते २० नोव्हेंबरपर्यंत ‘दिवाळी जादा’ नावाच्या लालपरीची सुविधा एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
दिवाळी उत्सव ५ नोव्हेंबरपासून चालू होणार असल्याने गावी जाण्यासाठी आतापासूनच एसटी महामंडळाने बसफेºयांचे नियोजन केले आहे. यामध्ये एका दिवशी १९ शेड्युल व ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाकडून करण्यात आले आहे. दिपावली सणानिमित्त व सलग सार्वजनिक सुट्टया येत असल्याने प्रवाशी गर्दीत वाढ होते. त्यामुळे मध्वर्ती कार्यालयाने दिलेल्या व नियंत्रण समितीने दिलेल्या जादा फेºया सुरू करण्यात येणार आहे. विविध मार्गांवर नियमितपणे बससेवा सुरू करण्याऐवजी कोणत्या मार्गांवर कोणत्या दिवशी प्रवाशांची गर्दी होते, याबाबत यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन पूर्वनियोजित जादा वाहतूकीचे नियोजन करून जादा वाहतूक करण्यात येत आहे. जादा वाहतूकीमुळे ऐनवेळी स्थानकावर होणाºया प्रवाशी गर्दीचा निपटारा करण्याच्या दृष्टीने वाहतूकीमधील लवचिकता राखणे शक्य होते. १ नोव्हेंबरपासून जादा वाहतूक सुरू करण्यात येत आहे. ह्या जादा फेºया २० दिवस चालणार आहेत. जादा बसेसवर ‘दिवाळी जादा’ असा उल्लेख करण्यात येणार आहे. बाहेरगावी कामानिमित्त राहत असलेल्यांना या जादा गाड्यांचा लाभ होणार आहे.
दिवाळीसाठी जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा विभागातून दिवसाला १९ शेड्यूल लावण्यात आलेले असून ३ हजार ७३३ अंतराचे नियोजन आहे.
- ऐ. यू. कच्छवे,
विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.