माझे रखडलेले काम कर, नाही तर तुझा खेळ खल्लास; जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्याला धमकी
By भगवान वानखेडे | Published: September 26, 2022 06:01 PM2022-09-26T18:01:51+5:302022-09-26T18:02:39+5:30
‘माझे रखडलेले काम आजच्या आज करुन दे, असे म्हणत एकाने येथील उपविभागीय जलसंधारण विभागात गोंधळ घातला.
बुलढाणा: ‘माझे रखडलेले काम आजच्या आज करुन दे, असे म्हणत एकाने येथील उपविभागीय जलसंधारण विभागात गोंधळ घातला. ऐवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यास व्हॉटसअप मॅसेजद्वारे ‘तुझा सगळा इतिहास काढला आहे, तुझा गेम होणार’. अशी धमकी दिली. अशी तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये २५ सप्टेंबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीष भागाजी गवळी हे येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयात कार्यरत आहेत. २२ सप्टेंबर रोजी ते कार्यालयात असताना देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथील दिपक मिसाळ त्यांच्या कार्यालयात आला होता. ‘माझे काम आजच्या आज करून द्या’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करीत गवळी यांच्या टेबलवरील फाईल फेकून दिली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी गवळी यांच्या व्हाट्सअपवर मॅसेज करून, तुझी उलटी गिनती सुरू झाली, फोन घे नाहीतर वेळ निघून जाईन, तुझा इतिहास मी काढला. तुझा गेम होणार आहे अशी धमकी दिली. अशी तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात दिली आरोपी दिपक मिसाळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय नागरे करीत आहेत.