गॅसजोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:21+5:302021-04-06T04:33:21+5:30
देऊळगाव राजा : शिधापत्रिकाधारक अथवा कुटुंबातील इतर कोणाही सदस्यांच्या नावे गॅस असलेल्या कुटुंबाची शिधापत्रिका रद्द करण्यात येऊ ...
देऊळगाव राजा : शिधापत्रिकाधारक अथवा कुटुंबातील इतर कोणाही सदस्यांच्या नावे गॅस असलेल्या कुटुंबाची शिधापत्रिका रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसंग्रामने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, बहुतांश जणांकडे घरगुती * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *गॅसजोडणीदेखील आहे. दरम्यान, गरिबांच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *गॅसजोडणी ठेवायची असेल तर शिधापत्रिका रद्द करावी लागेल त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांपुढे निर्माण झाला आहे.सदर हमी पत्रामुळे खूप लोकांचे शिधापत्रिका रद्द होऊन गरीब कुटुंब स्वस्त धान्यापासून वंचित राहातील अशी शक्यता आहे.त्यामुळे सदर अर्जातील हमीपत्र रद्द करून * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *गॅसजोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण,विनायक अनपट,अजमत पठाण,चंद्रभान झिने,संतोष हिवाळे,अयाज पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.