उंद्री ग्रामपंचायतच्या व्यापारी गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:55+5:302021-08-21T04:39:55+5:30
ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे ...
ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे की, उपरोक्त प्रमाणे आपणास दिलेल्या विहित कालावधीत आपणाकडे असलेले व्यापारी गाळ्यांची भाड्याची रक्कम व नियमानुसार परवानगी न घेतल्यास पोलीस संरक्षण घेऊन व्यापारी गाळे खाली करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे नमूद केले आहे. गाळेधारकांना रीतसर परवानगी घ्यावी असे नोटीसमध्ये सुचवले आहे. नियमानुसार त्याच गाळेधारकांना पुन्हा या गाळ्याबाबत परवानगी देणे किंवा मुदतवाढ देणे हे बेकायदेशीर ठरू शकते, कारण त्यांचे करारनाम्याची मुदत कित्येक वर्षे झाले संपलेली आहे. तसेच गाळे दुसऱ्यांना भाड्याने दिले आहेत. सर्वच गाळेधारक थकबाकीदार आहेत. तर आपण नोटीसमध्ये परवानगी घेणे बाबत नमूद केले आहे. तसेच गाळेधारकांना मुदतवाढ देण्यात येऊ नये व नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे गाळे खाली करून घेण्यासाठी पोलीस संरक्षणाकरिता ठराव घेण्यात यावा. अन्यथा गाळे खाली करून हर्राशी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व गावातील युवक,अपंग बांधवांच्या वतीने उंद्री ग्रामपंचायतीसमोर लोकशाही मार्गाने तसेच कोरोनाचे नियम पाळून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग)उदयनगर (उंद्री) शहर अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिखली तालुका उपाध्यक्ष राजीक खान तसेच गावातील युवक,अपंग बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर राजीक खान, रफिक शेख(तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तथा(ग्रा.पं.सदस्य)उंद्री ,गजानन आप्पा मापारी,अपंग सेलचे विनायक नसवाले,गजानन गावंडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.