पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये - नलावडे

By admin | Published: October 9, 2016 01:54 AM2016-10-09T01:54:48+5:302016-10-09T01:55:31+5:30

कान्हा चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांचे परखड मत.

Do not let Pakistani artists work - Nalawade | पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये - नलावडे

पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये - नलावडे

Next

बुलडाणा, दि. 0८- उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतातील चित्रपटात काम द्यायचे नाही, यामध्ये दोन मत प्रवाह आहेत. भारतात कोणत्याही प्रकारचा जातीभेद केल्या जात नाही. पंतप्रधान मोदी हे सुद्धा सर्वधर्म समभावाचे पुरस्कर्ते आहेत. पाकिस्तानी भारतामध्ये कलाकार म्हणून जगत असेल व तो भारताशी प्रामाणिक असेल, त्या कलाकाराला काम दिलेच पाहिजे. भारताशी गद्दारी करणार्‍या पाकिस्तानी कलाकाराला काम देऊ नये, कारण कलाकाराला कोणतीही जात नसते, असे परखड मत ह्यकान्हाह्ण चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांनी मांडले.
बुलडाणा अर्बन व बीसीसीएनच्यावतीने सुरू असलेल्या गरबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ८ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथे आल्या असता, आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बीसीसीएनचे संचालक सुधाकर अहेर, अँड. जितेंद्र कोठारी, सुधीर भालेराव यांची उपस्थिती होती. अभिनेत्री गौरी नलावडे म्हणाल्या, की मी विविध मराठी सिरिअलच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर आले. सैराटसारख्या चित्रपटामधून नागराज मंजुळे यांनी जे काही दाखविले आहे, ते वास्तव आहे. मुलांच्या भावना आई-वडील कशा दाबून ठेवतात, हे दाखविले. हेच मराठी प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहेत. माधुरी दीक्षित ही माझी प्रेरणा असून, ती ज्याप्रमाणे जीवन जगते तसेच मलासुद्धा जगायला आवडते. तिने मराठी जोडीदार निवडला मी सुद्धा मराठी जोडीदार निवडणार आहे. मला गायलासुद्धा आवडते. आई व वडिलांच्या आशीर्वादाने क्षेत्रात पर्दापण केले. वास्तविक आई प्रोफेसर व वडील एअर फोर्समध्ये असतानासुद्धा मी या क्षेत्रामध्ये करिअर करते. निसर्गरम्य बुलडाणा शहरातील मराठी चित्रपटप्रेमींनी आवडणार्‍या कथेवर चित्रपट काढल्यास त्यात मी नक्की भूमिका करेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रास्ताविक सुधीर भालेराव यांनी केले.

Web Title: Do not let Pakistani artists work - Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.