बालकांची निरागसता कोमेजू न देता शिक्षण द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2017 09:54 AM2017-07-09T09:54:24+5:302017-07-09T09:54:24+5:30

खामगावातील पत्रपरिषदेत कुलगुरु रिटा सोनवटे यांचे प्रतिपादन.

Do not teach children without harmlessness! | बालकांची निरागसता कोमेजू न देता शिक्षण द्या!

बालकांची निरागसता कोमेजू न देता शिक्षण द्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव(जि. बुलडाणा): शिक्षण पदवी तथा पदविकाप्राप्त शिक्षक विद्यार्थ्यांंना शिक्षणाचे धडे देण्यामध्ये तज्ज्ञ असतात; मात्र प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षणपद्धती वेगळी असते. मात्र याकडे सपशेज दुर्लक्ष करुन काही शैक्षणिक संस्थाद्वारे मोठय़ांची शिक्षणपद्धती चिमुकल्यांवर लादल्या जात असल्याची खंत मुबंई येथील एसएनडीटी महिला विद्या पीठाच्या कुलगुरु रिटा सोनवटे यांनी केले.
खामगाव तालुक्यातील कनारखेड येथील एन.व्ही. चिन्मय विद्यालयात शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लहान मुलांना हसत-खेळत शिक्षण कसे द्यावे, यावर एनएसडीटी महिला विद्यापीठाने शिक्षणपद्धती विकसीत केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणार्‍या शिक्षण पध्दतींचा सखोल अभ्यास करुन चिमुकल्यांवर मानसिक ताण न देता जास्तीत जास्त त्यांना कसे शिकविता येईल, याचा विचार करुन ही पद्धती विकसीत केली आहे. ही पद्धती शाळांनी अवलंबवावी तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या या आमुलाग्र बदलात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Do not teach children without harmlessness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.