पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाची चाैकशी करा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:43+5:302021-09-02T05:14:43+5:30
मेहकर : पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट हाेत आहे. या कामाची चाैकशी करून दाेषीवर कारवाई करण्याच्या ...
मेहकर : पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट हाेत आहे. या कामाची चाैकशी करून दाेषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विजय पवार यांनी मेहकरातील लाेणार वेस येथे १ सप्टेंबरपासून उपाेषण सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्त्याची पाहणी करत नाहीत, ताेपर्यंत उपाेषण सुरूच ठेवण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.
पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत आहे. डीपीआरनुसार कामाचा दर्जा नसून अतिक्रमणे न काढताच काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, रस्त्याची रुंदी कमी झाली असून, पुढे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शारंगधर बालाजी, हिवरा आश्रम, लोणार सरोवर, शेगाव व मुख्य नागपूर, औरंगाबाद महामार्ग, समृद्धी महमार्ग यांना जाेडणारा हा पालखी मार्ग आहे. या मार्गावरून लाखो लोक दररोज प्रवास करणार आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी पवार यांनी केली असून, ना. नितीन गडकरी हे रस्त्याची पाहणी करणार नाहीत, ताेपर्यंत उपाेषण सुरूच ठेवण्याचा निर्धार पवार यांनी केला आहे.