पाॅलिटेक्निकनंतर नाेकरी मिळते का रे भाऊ? ९९० जागांसाठी १२८५ विद्यार्थ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:07+5:302021-09-17T04:41:07+5:30
बुलडाणा : राेजगाराभिमुख पदविका असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाॅलिटेक्निककडे ओढा वाढला आहे. गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज ...
बुलडाणा : राेजगाराभिमुख पदविका असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाॅलिटेक्निककडे ओढा वाढला आहे. गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज वाढले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकूण पाच पाॅलिटेक्निक महाविद्यालये आहेत. त्यासाठी ९९० जागा आहेत. इतर क्षेत्रांपेक्षा पाॅलिटेक्निकची पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकर राेजगार मिळताे. त्यातच जिल्ह्यात माेजकेच पाॅलिटेक्निक महाविद्यालये राहिल्याने विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. मुदतीपर्यंत १२८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
पाॅलिटेक्निक डिप्लाेमा केल्यानंतर राेजगार लवकर मिळताे़ तसेच जेईई, सीइटी परीक्षा न देता अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळताे. १२वीनंतर अभियांत्रिकीला येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पाॅलिटेक्निकनंतर अभियांत्रिकी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीत प्राधान्य मिळत आहे. शासनाने पाॅलिटेक्निक मराठी माध्यमातून सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या अर्जांचा पाऊस पडला आहे. अभियांत्रिकीसाठी अर्ज करण्याची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत हाेती.
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
एकूण पाॅलिटेक्निक महाविद्यालये
०५
एकूण प्रवेश क्षमता
९९०
एकूण प्रवेश अर्ज
१२८५
पाॅलिटेक्निक महाविद्यालये
०१ शासकीय महाविद्यालय
०४ खासगी महाविद्यालये
महाविद्यालय प्रवेश क्षमता
३६० शासकीय
६३० खासगी
पाॅलिटेक्निक डिप्लाेमा केल्यानंतर राेजगार लवकर मिळताे़ तसेच जेईई , सीईटी परीक्षा न देता अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळताे. १२वीनंतर अभियांत्रिकीला येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पाॅलिटेक्निकनंतर अभियांत्रिकी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीत प्राधान्य मिळते तसेच आता मराठी माध्यमातून शिक्षण असल्यानेही विद्यार्थ्यांचा पाॅलिटेक्निककडे ओढा वाढला आहे.
डाॅ. अनुपसिंह आर. राजपूत, प्राचार्य, रामभाऊ लिंगाडे पाॅलिटेक्निक काॅलेज, बुलडाणा
पाॅलिटेक्निक जाॅब ओरिएंटेड काेर्स असल्याने गत काही वर्षांपासून याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. सध्या स्किल लेबरची मागणी प्रचंड वाढली आहे. इतर शिक्षणाच्या तुलनेत पाॅलिटेक्निक केल्यानंतर लवकरच कमी कालावधीत जाॅब मिळताे. डिप्लोमा सिव्हील, इलेक्ट्रिकलसाठी सरकारी नोकरीमध्येसुद्धा खूप जागा निघत आहेत. त्यामुळे पाॅलिटेक्निकच्या संगणक, इलेक्ट्रीक, सिव्हील, आदी शाखांना विद्यार्थ्यांचा माेठा प्रतिसाद आहे.
प्रा. डाॅ. किशाेर वळसे, वरिष्ठ प्राध्यापक
अनुराधा अभियांत्रिकी काॅलेज, चिखली
म्हणून पाॅलिटेक्निकला पसंती
पाॅलिटेक्निक केल्यानंतर लवकरच राेजगार मिळताे तसेच अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळत असल्याने पाॅलिटेक्निकला प्रवेश घेतला. इतर क्षेत्राच्या तुलनेत राेजगार ओरिएंटेड काेर्स आहे.
प्रेरणा देशमुख, विद्यार्थीनी
गत काही वर्षांपासून बेराेजगारी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलतेन पाॅलिटेक्निक केल्यानंतर लवकर जाॅब मिळताे तसेच आता पाॅलिटेक्निक मराठी माध्यमातून करता येत असल्याने साेपे झाले आहे. त्यामुळे, पाॅलिटेक्निकला प्रवेश घेतला.
आदित्य बाेधनकर,विद्यार्थी