नांदुरा येथे कोविड सेंटरवरील डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 09:32 PM2021-05-22T21:32:03+5:302021-05-22T21:33:47+5:30
Nandura News : एका व्यक्तीने नांदुरा येथे कोविड सेंटरवरील डॉक्टरला मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : शहरातील शासकीय कोविड सेंटरवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी चेतन बेंडे यांनी फॅबीफ्ल्यु गोळ्या दिल्या नाही म्हणून या कारणाने दिपक वसंत
कळस्कार यांनी अश्लिल शिवीगाळ करत डॉ. बेंडे यांना
मारहाण केल्याची घटना शनिवार २२ मे च्या सायंकाळी ५
वाजेदरम्यान शासकीय कोविड सेंटर नांदुरा येथे घडली. याबाबत डॉ. बेंडे यांनी नांदुरा पोलिस
स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दि. २२ मे च्या संध्याकाळी दिपक वसंत कळस्कार हे कोविड सेंटरला आले व त्यांची पत्नी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने टाकरखेड
येथील रुग्णालयात फॅबी फ्ल्यु गोळ्या नाहीत
म्हणून या गोळ्या मला द्या अशी मागणी केली. यावरुन डॉ भेंडे यांनी त्यांना सांगिते की, रुग्ण सोबत आणल्या शिवाय गोळ्या मिळणार नाहीत. यावरून संतापून सदर आरोपीने अश्लिल शिवीगाळ करत डॉ.बेंडे यांना मारहाण केली. डॉ.बेंडे यांच्या तक्रारीवरुन आरोपी दिपक वसंत कळस्कार वय ३१ वर्ष रा. टाकरखेड यांच्याविरुध्द कलम 353, 332, 294, 186, 189 भादवी नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.