डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्याची वाटतेय भीती! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:10+5:302021-01-08T05:53:10+5:30
बुलडाणा : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार ...
बुलडाणा : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र, प्रथमच वापर हाेत असलेल्या या लसीमुळे साइड इफेक्ट हाेण्याची भीती काही डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे चित्र आहे. ४० टक्के आराेग्य कर्मचारी लसीकरणासाठी तयार असल्याचे चित्र आहे.
सर्वांत प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खासगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागांतील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात ५० वर्षांच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ‘को-विन’ ॲपवर नोंदणी करण्यात येत आहे. शासकीय डाॅक्टर आणि आराेग्य कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत १०० टक्के नाेंदणी केली आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत १ हजार ८२५, तर जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येत असलेल्या ८ हजार ६७० डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच खासगी ३ हजार ९५४ पैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची नाेंदणी अजूनही शिल्लक आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे लस घ्यावी किंवा नाही याविषयी काही आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे. तसेच प्रथमच लसीकरण हाेत असल्याचे त्याचे दुष्परिणाम हाेण्याची भीती काही कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना
काेराेना लस प्रथमच देण्यात येत असल्याने तिच्या साइड इफेक्टविषयी कुणालीही माहिती नाही. तसेच काेराेना रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे लस घ्यावी किंवा नाही याविषयी काही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
काेराेना लसीकरणाविषयी डाॅक्टरांसह आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये कुठलीही भीती नाही. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच सदस्यांनी नाेंदणी केली आहे. काेराेना लस घेण्यासाठी आम्ही तयार आहाेत.
- डाॅ. जयसिंग मेहेर, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन
प्रशासनाची जय्यत तयारी
लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वेळाेवेळी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी २९ डिसेंबर राेजी आढावा बैठकीत सादरीकरणही केले आहे. ‘लसीकरण कसे राहणार’ याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली हाेती.