डॉक्टरांचे आज एक दिवसीय उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 08:35 PM2017-10-01T20:35:46+5:302017-10-01T20:35:56+5:30
बुलडाणा : शासनाकडे वारंवार मागण्या, विनंत्या करूनही मागण्या मान्य होत नसल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

डॉक्टरांना कागदोपत्री त्रुटींसाठी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शिक्षा तथा दंड देण्यात येऊ नये, क्लिनिकल एसट्याब्लिशमेंट अॅक्ट व पीसीपीएनडीटी अॅक्ट ठरल्याप्रमाणे लावण्यात यावा, डॉक्टरांवर होणारे हल्ले याबाबत सरकारने केंद्रात कायदा करावा, नॅशनल मेडिकल काऊंसिल रद्द करण्यात यावी, वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्यास अवास्तव दंड लावण्यात येऊ नये या आणि अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स उद्या गांधी जयंतीच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करणार आहेत. उपरोक्त मागण्या गेल्या अनेक दिवसापासून शासन दरबारी मांडण्यात येत आहे, मात्र सरकारकडून त्यावर कुठलीच सकारात्मक कारवाई न केल्या गेल्याने असोएिशनने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे इंडियन मेडिकल असोशिएशनचे बुलडाणा अध्यक्ष डॉ.एल.के.राठोड, सचिव डॉ.अशोक एस.भवटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.