शेतकऱ्यांकडून मिळालेली देणगी अमूल्य - बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:35+5:302021-05-24T04:33:35+5:30

चिखली : येथील जुना गाव परिसरातील लोकसहभागातून साकारत असलेल्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे ...

Donations from farmers are invaluable - Bondre | शेतकऱ्यांकडून मिळालेली देणगी अमूल्य - बोंद्रे

शेतकऱ्यांकडून मिळालेली देणगी अमूल्य - बोंद्रे

googlenewsNext

चिखली : येथील जुना गाव परिसरातील लोकसहभागातून साकारत असलेल्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या पार पडले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून अनुराधा नगर परिसरात सुरू करण्यात आलेल्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडीकेटेड कोविड सेंटरच्या ऑक्सिजन प्रकल्पाला ११ हजार रुपयांची मदत दिली. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाने लोकवर्गणीतून दिलेली देणगी अमूल्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोंद्रे यांनी व्यक्त केली.

लोकसहभागातून शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याचे काम हाती घेत असतानाच भूमिपूजनप्रसंगी जमलेल्या शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. याप्रसंगी राहुल बोंद्रे, निंबराव देशमुख, प्रल्हाद देशमुख, नाना राऊत, गजानन देशमुख, आनंद महाजन, श्रीकांत बोंद्रे, अर्चना बोंद्रे, संजय राऊत, विजय देशमुख, तेजराव देशमुख, राजेश देशमुख, संजय क-हाळे, राजू क-हाळे, दिलीप क-हाळे, प्रभाकर चवरे, अशोक चवरे, विष्णू चवरे, रामदास चवरे, विश्वनाथ चवरे, जगन गवारे, एकनाथ गवारे, भगवान वीर, नाना देशमुख, शे. अल्ताफ, दगडू पटेल आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Donations from farmers are invaluable - Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.