बोंडअळी व अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 06:55 PM2018-05-19T18:55:25+5:302018-05-19T18:55:25+5:30

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.

dont get bollworm and the overflow subsidy, then round the Guardian Minister | बोंडअळी व अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव

बोंडअळी व अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव

googlenewsNext
ठळक मुद्देजवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे.आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे.

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अतिवृष्टी व बोंडअळीचे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. जे काही पीक थोड्याफार प्रमाणात हाती लागले, त्या पिकांना बाजारात भाव नाही. बॅकेचे कर्जही वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयांनी मागील वर्षी व्याजाने पैसे काढून उसनवार करून, तर कधी उधारीवर बि-बियाणे व खते खरेदी करून पेरणी केली होती. मात्र निसर्गाची अवकृपा झाल्याने मेहकर तालुक्यात भिषण अतिवृष्टी झाली होती व कापसावर बोंडअळीचा रोग पडला होता. यामध्ये मेहकर तालुकयातील हजारो शेतकºयांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भाजप सरकारने अधिकाºयाक डून सर्वे करून घेवून नुकसानीचा अहवाल मागविला होता. अहवाल जावून जवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे. पेरणीच्या वेळेवर शेतकºयांना जर पैसे मिळाले नाही तर शेतकरी हतबल होऊन आत्महत्याचा मार्ग अवलंबतील, अशी बिकट परिस्थिती शेतकºयांची झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टी व बोडअळीचे अनुदान आठ दिवसात न मिळाल्यास पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, प्रभाकर सपकाळ, अ‍ॅड.विजय मोरे, गजानन सावंत, निसार अंसारी ,संजय गायकवाड, संजय शेळके, गजानन काळे, विठ्ठल पायघन, उध्दव भालेराव, संतोष मते आदीनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: dont get bollworm and the overflow subsidy, then round the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.