विठ्ठला काेराेनाची तिसरी लाट येऊ देऊ नकाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:06+5:302021-07-22T04:22:06+5:30
देऊळगांव कुंडपाळ : विठ्ठला, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस, असे साकडे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २० जुलै ...
देऊळगांव कुंडपाळ : विठ्ठला, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस, असे साकडे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २० जुलै राेजी आषाढी एकादशी निमित्ताने घातले. विठ्ठल रखुमाईची त्यांचे हस्ते सपत्निक महापूजा झाली. यावेळी मंदिराचे संस्थापक तुळशीदास महाराज सरकटे, ओतुरकर, शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, सरपंच शेषराव डोंगरे, ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये, उपसरपंच विष्णू सरकटे, भागवत नरवाडे, सतीश राठोड, आश्रुजी सरकटे, विष्णू जायभाये, शिरुभाऊ मापारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तुळशीदास महाराजांनी केली. आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बबन महाराज ढाकणे आणि सहकारी यांनी काकडा भजन, त्यानंतर आ.डॉ.संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांच्या हस्ते विधिवत विठ्ठल-रखुमाईची महापूजा, त्यानंतर सुदाम महाराज पानेगांवकर यांचे जाहीर हरीकीर्तन झाले़ व डॉ.महाजन, मुंबई व शिरुभाऊ मापारी यांचे वतीने फराळ व केळी वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो विठ्ठलभक्तांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थही उपस्थित हाेते.
आमदारांनी केली दोन सभामंडपांची घाेषणा
आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी आमदार निधीतून विठ्ठल-रखुमाई मंदिरासाठी एक व साखरतळे देवी संस्थानसाठी एक असे दोन सभामंडप देण्याची घोषणा केली, तसेच डॉ़.अमोल सरकटे यांनी वझर आघाव रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असता, रस्ताही मंजूर असून, लवकरच काम सुरू होईल, असे आमदार रायमुलकर यांनी सांगितले.