दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:00+5:302021-05-05T04:57:00+5:30
उशीर झाला तरी चालेल; परंतु डोस आवश्यक दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तरी चालतो; परंतु तो घेणे आवश्यकच आहे. ...
उशीर झाला तरी चालेल; परंतु डोस आवश्यक
दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तरी चालतो; परंतु तो घेणे आवश्यकच आहे. पहिला डोस कोविशिल्ड असेल, तर दुसऱ्या डोसचे दोन महिन्याचे अंतर चालते; परंतु इतर डोस असेल तर साधारणत: एक आठवड्याचा विलंब चालू शकतो.
बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.
दोन ते चार आठवड्यात अँटिबॉडी
तज्ज्ञांच्या मते, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारशक्ती शरीरात जगवण्याचे काम करतो. त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते; पण दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटिबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करीत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे.