ओबीसी समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:09+5:302021-09-16T04:43:09+5:30
बुलडाणा : राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे व अक्षम्य दुर्लक्षनामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे ...
बुलडाणा : राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे व अक्षम्य दुर्लक्षनामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे भवितव्य टांगणीला लागले असून असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ओबीसींच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा त्याचे मोठे परिणाम या तिघाडी सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी दिला.
बुलडाणा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ सप्टेंबर रोजी निषेध आंदोलनात करण्यात आले. यावेळी ॲड. देशमुख बोलत होते. या आंदोलनात ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष डॉ. अनिल जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष माया पदमने, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, ज्येष्ठ नेते जगदेवराव बाहेकर, सखाराम नरोटे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, अर्जुन दांडगे, ॲड. दशरथसिंग राजपूत, गजानन जाधव, अरुण मुंडे, गजानन देशमुख, पद्मनाभ बाहेकर, मंदार बाहेकर, विनायक भाग्यवंत, अर्जुन लांडे, गणेश देहाडराय आदींसह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आक्रोश करण्यात आला. तसेच ॲड. सुनील देशमुख व डॉ.अनिल जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी गिते यांना निवेदन देण्यात आले.