कोरोनावर प्राणायामाची मात्रा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:26+5:302021-05-09T04:36:26+5:30
बुलडाणा : गत काही महिन्यांपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना काळात शरीर ...
बुलडाणा : गत काही महिन्यांपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना काळात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी याेग, प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे़
काेराेना काळात शरीर राेगमुक्त ठेवण्यासाठी अनेक जण याेगाचा आधार घेत आहेत़ प्राणायाम हा योगाचा एक भाग असून यामध्ये श्वास घेण्याच्या विविध पद्धती आहेत. प्राणायमाचा उद्देश हा शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरित, संचारित, नियमित आणि संतुलित कऱणे हा असतो. या प्रक्रिया नासिकांद्वारे श्वास घेण्यावर अवलंबून आहेत. श्वास हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. योग्य पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करताे़
काेराेना झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास हाेताे़ तसेच फुफ्फुसावर परिणाम हाेताे़ प्राणायामाचे दाेन ते तीन प्रकार नियमित केल्यास रुग्णांना अनेक आजारातून मुक्तता मिळू शकते़ काेराेना रुग्णांसाठी भस्रिका, कपालभाती आणि नाडीशाेधन प्राणायाम लाभदायक ठरत आहेत़ त्यामुळे, अनेक जण याेग करण्याकडे वळल्याचे चित्र आहे़ नियमित याेग, प्राणायाम केल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढते़ कपालभाती या प्राणायामाच्या प्रकारात उच्छ्वासाद्वारे आपल्या शरीरातील ८० टक्के विषद्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकली जातात. कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. विशेषत: मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो. भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलदगतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते तसेच नाक, घसा व सायनसमधील अडथळे दूर होतात.
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. विशेषत:मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, तसेच शरीराला उर्जा मिळते तसेच नाक, घसा व सायनसमधील अडथळे दूर होतात. हा प्राणायामाचा प्रकार पोटविकार, अपचन, गॅसेस या त्रासांमध्येही लाभदायक ठरू शकतो.
नाडीशोधन प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व रक्ताभिसरण सुधारते. या प्राणायामुळे शरीरातील ऑक्सिजन व कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण सुधारते. त्यामुळे अशुद्ध रक्ताचा निचरा होऊन शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तसेच शरीरातील तापमानात समतोल राखण्यास मदत होते.
नियमित याेग केल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढते़ रक्ताभिसरण सुलभ हाेते़ ताण, तणावातून मुक्ती मिळते़ ऊर्जा वाढते़ उत्तम आराेग्य आणि प्रसन्न मन याेग प्राणायामुळे लाभते़ काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी याेग, प्रणायामाचा उपयाेग केला जाताे़ नियमित याेग, प्राणायाम केल्याने ऑक्सिजन लेव्हल वाढते़ नैराश्य दूर हाेऊन उत्साह येताे़
अंजली परांजपे, याेग व निसर्गाेपचारतज्ज्ञ
काेराेनाच्या काळात नियमित याेग, प्राणायाम केल्यास लाभ हाेताे़ भस्रिका प्राणायाम, नाडीशोधन आणि कपालभाती आदी प्राणायाम काेराेना रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहेत़ सकारात्मक जीवन जगण्यासाठी याेग, प्राणायामाचे महत्त्व आहे़
संजय नागरे, याेगपटू