२४ गावांसाठी केवळ दोन हजार ३०० लसींचे डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:03+5:302021-05-07T04:36:03+5:30
लसीचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने अनेक अडचणी येत असून, याकडे प्रशासनाकडून लक्ष देण्याची मागणी होत आहे. सध्या कोरोनाचा ...
लसीचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने अनेक अडचणी येत असून, याकडे प्रशासनाकडून लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस बंधनकारक आहे. त्यामुळे पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावांची लोकसंख्या ३५ हजार ६०० आहे. दोन वैद्यकीय अधिकारी व २२ ते २५ कर्मचारी आहेत. ४५ वयोगटातील एकूण लोकसंख्या दोन हजार असून, त्यापैकी फक्त २३०० नागरिकांना लस दिली गेली आहे. यामध्ये बरेच नागरिक लसीपासून वंचित आहेत.
लसीकरण पुन्हा जोमाने सुरू होईल
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता लस ही टप्प्याटप्प्याने मिळत आहे. तरी पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना लसीकरणाला प्रतिसाद द्यायला हवा होता तो दिसून आला नाही. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक लस घेत आहेत. लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण मोहीम पुन्हा जोमाने सुरू करू, असे मत प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तूपकर यांनी व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र लसअभावी ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
शकुंतलाबाई गणपत महाले,
सरपंच, ग्रामपंचायत मासरूळ