गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात दुपटीने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:33 AM2020-10-20T11:33:41+5:302020-10-20T11:34:05+5:30

Pink bollworm in Buldhana District सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक आहे.

Double the incidence of pink bollworm in Buldhana District | गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात दुपटीने वाढ 

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात दुपटीने वाढ 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात दुपटीने वाढ होऊन ऑक्टाेबरच्या पहिल्या पंधरवाडयात तो १० टक्के झाला आहे. विदर्भातील संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि महाविद्यालयातील किटकशास्त्रज्ञांनी याबाबत अहवाल दिला आहे.  
    किटकशास्त्र विभागात दर महिन्याच्या १ व १६ ला विदर्भातील सर्व जिल्हयातील किटकशास्त्रज्ञांची पिकावरील कीड परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केद्र, कृषि विज्ञान केंद्रे व कृषि महाविद्यालय येथील कार्यरत किटकशास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात कृषि अधिकाऱ्यासमवेत सर्वेक्षण करून किड परिस्थितीबाबत माहिती सादर करतात. नुकत्याच  १६ ऑक्टोंबर रोजी विदभार्तील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चचेर्नुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाइयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात तो १० टक्के झाला. सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: Double the incidence of pink bollworm in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.