पत्नीचा खून करणाऱ्यास दुहेरी जन्मठेप; बुलढाणा न्यायालयाचा निकाल, चारित्र्यावर संशय घेत केला होता खून

By निलेश जोशी | Published: May 20, 2024 07:07 PM2024-05-20T19:07:41+5:302024-05-20T19:08:15+5:30

याप्रकरणी मृत महिलेचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांची मुलगी पूजा उर्फ गीता हिचा जालना येथील गजानन विश्वनाथ जाधव याच्यासोबत २०११मध्ये विवाह झाला होता.

Double life imprisonment for wife killer Buldhana court verdict, the murder was committed on suspicion of character | पत्नीचा खून करणाऱ्यास दुहेरी जन्मठेप; बुलढाणा न्यायालयाचा निकाल, चारित्र्यावर संशय घेत केला होता खून

पत्नीचा खून करणाऱ्यास दुहेरी जन्मठेप; बुलढाणा न्यायालयाचा निकाल, चारित्र्यावर संशय घेत केला होता खून

बुलढाणा : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा चाकूने वार करून खून करणाऱ्यास २० मे रोजी बुलढाणा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व १६ हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. गजानन विश्वनाथ जाधव (३५, रा. जालना) असे आरोपीचे नाव असून, बुलढाणा शहरातील जगदंबनगरमध्येच ही घटना घडली होती. बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकानजीक असलेल्या जगदंबनगरमध्ये ९ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली होती.

याप्रकरणी मृत महिलेचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांची मुलगी पूजा उर्फ गीता हिचा जालना येथील गजानन विश्वनाथ जाधव याच्यासोबत २०११मध्ये विवाह झाला होता. परंतु, गजानन हा पत्नी पूजा उर्फ गीताच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यातून तिला मारहाण करून मानसिक त्रास देत होता.

सुरेश तायडे त्यांना यांनी समजावूनही सांगितले होते. त्यांना तीन मुली झाल्या होत्या. मात्र, हा प्रकार वाढत होता. अशातच घटना घडण्याच्या एक ते दीड महिन्यापूर्वी पूजा उर्फ गीता ही त्रासाला कंटाळून माहेरी बुलढाणा येथे आली होती. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी तिच्या मागोमाग आरोपी गजानन हाही बुलढाण्यात आला होता. ९ ऑगस्ट रोजी तायडे हे पत्नी व मुलीसह कामानिमित्त बाहेर गेले होते. दोन मुली घराबाहेर खेळत होत्या. त्या दरम्यान घरात एकटी असलेल्या पुजावर आरोपी गजानन याने दोन चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पूजाला स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

गजाननचाही दोन मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीची हत्या केल्यानंतर गजानन याने त्याच्या बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन संगम तलावात उडी मारली होती. परंतु, सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिघांनाही वाचविले होते. त्यानंतर गजाननने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली होती. प्रकरणात तायडे यांनी तक्रार दिली होती.

१५ जणांच्या साक्षी महत्त्वाच्या

हे प्रकरण न्यायालायत सुनावणीसाठी आले असता जिल्हा सरकारी वकील वसंतराव लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण १५ साक्षीदार तपासले होते. यात घरा शेजारी राहणाऱ्या स्वाती चव्हाण, सविता सावंत, दिनकर पवार, संतोष खिल्लारे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यासाबेतच घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय पुराव्यांची ॲड. भटकर यांनी सुयोग्य जोड युक्तिवादादरम्यान दिली.

गजाननला दुहेरी जन्मठेप

उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकून बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) एस. बी. डिगे यांनी आरोपी गजानन जाधव यास विविध कलमांन्वये तथा पत्नीचा खून, दोन मुलींना जिवे मारण्याचा प्रयत्नासह स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रकरणातील विविध कलमांन्वयेही विविध स्वरूपाच्या शिक्षा त्यास सुनावल्या आहेत. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत. प्रकरणात सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू, ठसेतज्ज्ञ रामेश्वर गाढवे तसचे कोर्ट पैरवी किशोर कांबळे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

Web Title: Double life imprisonment for wife killer Buldhana court verdict, the murder was committed on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.