बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर दुबार पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:07 PM2020-07-07T17:07:48+5:302020-07-07T17:08:08+5:30

दोन हजार २१ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.

Double sowing on two thousand hectares in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर दुबार पेरणी

बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर दुबार पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्याचा फटका बसला आहे. दोन हजार २१ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. शेतकºयांच्या तक्रारीवर कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरूवात केली असली तरी मदतीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. खरीपाचे नियोजन ७ लाख ३७ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर आहे. शेतकरी कोरोनाच्या संकटकाळातही पेरणीच्या कामात व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे पेरणीला मृग नक्षत्रात सुरूवात झाली. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमतेची चाचणी घेण्यात यावी. त्यासाठी गावनिहाय कार्यक्रम आखण्यात आले होते. गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना केलेली आहे.
या पथकांकडून खते, बियाणे व किटकनाशक दुकानांची तपासणी करण्यात आली. मात्र तरीसुद्धा शेतकºयांना यंदा बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे.

Web Title: Double sowing on two thousand hectares in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.