बिबट्याची नऊ तासांनंतर विहिरीतून सुटका
By admin | Published: April 16, 2016 01:55 AM2016-04-16T01:55:21+5:302016-04-16T01:55:21+5:30
संग्रामपूर तालुक्यातील घटना.
संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील आलेवाडी शिवारातील महबूब गौलकार यांच्या शेतातील ६0 फूट खोल कोरड्या विहिरीत सात ते नऊ महिन्यांचे मादी बिबट १४ एप्रिल रोजी रात्री पडले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वन्यजीव विभागाच्या अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांच्या बचाव पथकाने तब्बल नऊ तासांनंतर बिबट्याला विहिरीतून काढण्यात यश मिळविले. वन्यजीव विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांनी रात्री १ पासून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तसेच रेक्सू टीमच्या कर्मचार्यांनी सदर बिबट्याला पिंजर्यात बंदिस्त करण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला होता. रात्री १ पासून विहिरीत सोडलेल्या पिंजर्यात बिबट्याला सकाळी ४ वाजताच्या सुमारास बंदिस्त करण्यात वन विभागाच्या कर्मचार्यांना व बचाव पथकांना यश आले.